काँग्रेस कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी ठोकला काँग्रेसला रामराम…

0

लोकशाही न्युज नेटवर्क

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर मराठवाड्यात आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा दणका बसला आहे.

माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या 2 दिवसात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आणखी एक नेत्याने काँग्रेसला रामराम ठोकत मोठा धक्का दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.