पाकिस्तानला मिळणारे ‘रावी नदी’चे पाणी अखेर रोखले जाणार

0

लोकशाही न्युज नेटवर्क

भारताने अखेर पाकिस्तानात जाणारे रावी नदीचे पाणी रोखले आहे. तब्बल 45 वर्षांपासून वाट पाहिली जात असलेले रावी नदीवरील शहापूर कँडी धरण अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून पाकिस्तानात वाहून जाणार पाणी बंद करण्यात आला आहे.

जागतिक बँकेच्या देखरेखीखाली 1960 मध्ये झालेल्या सिंधू जल कराराअंतर्गत रावी नदीच्या पाण्यावर भारताचा विशेष अधिकार आहे. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात शहापूर कंडी, बॅरेज, जम्मू कश्मीर आणि पंजाब यांच्यातील वादामुळे अडकून पडलेला होता. मात्र मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाणी पाकिस्तानात वाहत जात होते.

सिंधू जल कराराअंतर्गत रावी, सतलज आणि व्यास नद्यांच्या पाण्यावर भारताचा संपूर्ण अधिकार आहे, तर सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे. 1997 मध्ये पंजाब आणि जम्मू कश्मीर मधील सरकारांनी पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यासाठी रणजीत सागर धरण आणि शाहरुर बॅरेज कंडी तयार करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारांतर्गत जम्मु-कश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री शेख मोहम्मद अब्दुल्ला आणि पंजाबचे प्रकाश सिंह बादल यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

1982 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या योजनेची पायाभरणी केली होती त्यानंतर 1998 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. रणजीत सागर धरणाचे बांधकाम 2001 मध्ये पूर्ण झाले होते. शहापूर कंडी बॅरेज तयार होऊ शकलं नाही आणि रावी नदीचं पाणी पाकिस्तानला मिळत राहीले. 2008 मध्ये शहापूर कंडी

योजनेला राष्ट्रीय योजना घोषित करण्यात आलं होतं. मात्र बांधकाम २०१३ मध्ये सुरू झालं. २०१४ मध्ये पंजाब आणि जम्मू काश्मीर यांच्यात वादा सुरू झाल्याने ही योजना पुन्हा लांबत गेली.

Leave A Reply

Your email address will not be published.