मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद, RBI ने जारी केली यादी

1

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

जर तुम्हाला बँकेचे व्यवहार करायचे असतील तर आताच नियोजन करून घ्या. कारण मे महिन्यात बँका 13 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) मे 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार तब्बल 13 दिवस बॅंका बंद असणार आहे. विशेष म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला चार दिवस बँका बंद राहणार आहेत.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीलाच सलग चार दिवस बँकेला सुट्टी असेल. बॅंकेच्या या सुट्ट्या राज्य आणि तिथल्या सणांनुसार बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआयकडून चार आधारावर जारी केली जाते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांवर आधारित आहे.

राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, राज्यांनुसार काही सुट्ट्या देखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यात विविध झोनमधील एकूण 31 दिवसांपैकी 13 दिवस बँका बंद राहतील. बँकांच्या वतीने ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी मे महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी या सुट्ट्यांवर लक्ष ठेवावे. तुमच्या शहरात किंवा राज्यात कोणत्या महत्त्वाच्या दिवशी शाखा बंद राहतील याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी.

मे महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी
1 मे 2022: कामगार दिन / महाराष्ट्र दिन. देशभरातील बँका बंद. या दिवशी रविवार असल्यामुळेही सुट्टी असेल.
2 मे 2022: महर्षि परशुराम जयंती – अनेक राज्यांमध्ये सुट्टी
3 मे 2022 : ईद-उल-फित्र, बसव जयंती (कर्नाटक)
4 मे 2022: ईद-उल-फित्र, (तेलंगणा)
9 मे 2022: गुरु रवींद्रनाथ जयंती – पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा
14 मे 2022: दुसऱ्या शनिवारी बँकांना सुट्टी
16 मे 2022: बौद्ध पौर्णिमा
24 मे 2022: काझी नजरुल इस्माल यांचा जन्मदिवस – सिक्कीम
28 मे 2022: चौथा शनिवारी बँकांना सुटी

मे 2022 मध्ये साप्ताहीक बँक सुट्ट्यांची यादी
1 मे 2022 : रविवार
8 मे 2022 : रविवार
15 मे 2022 : रविवार
22 मे 2022 : रविवार
29 मे 2022 : रविवार

 

1 Comment
  1. Appaji Apte says

    वेड लागलं आहेका वार्तहराला? देशभरातल्या सुट्या एकत्र दाखवून गोंधळ घालतो आहे. मग जगातल्या एकत्र दाखवा की

Leave A Reply

Your email address will not be published.