लक्ष द्या ! सलग 5 दिवस बँका राहणार बंद

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्हालाही बँकेचे काही काम असेल तर लवकर पूर्ण करून घ्या कारण येत्या दिवसात सलग  5  दिवस बँका बंद असणार आहेत. डिसेंबर महिन्याचे शेवटचे काहीच दिवस शिल्लक असून ख्रिसमस देखील जवळच आहे. 25 तारखेला म्हणजेच येत्या सोमवारी ख्रिसमस असल्याने सुट्टी आहे. त्यातच बँका 5 दिवस बंद असणार आहे.

23 डिसेंबरला शनिवार आणि 24 डिसेंबरला रविवार असल्याने बँकाही बंद राहतील. अनेक ठिकाणी नाताळनिमित्त 27 तारखेपर्यंत सुट्टी असेल. 25-26 डिसेंबर रोजी आयझॉलमध्ये बँका बंद राहतील.यानंतर 25-26-27 रोजी ख्रिसमसच्या सणाला कोहिमामध्ये बँका बंद राहतील आणि शिलाँगमध्ये 25-26 रोजी ख्रिसमसच्या सुट्ट्या असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या यादीनुसार बँका 5 दिवस बंद असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.