४ वर्षीय शाळकरी मुलीवर शाळेच्या वॉचमनने केला लैंगिक अत्याचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ४ वर्षीय शाळकरी मुलीवर शाळेच्याच वॉचमनने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मालाडच्या मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथील ही धक्कादायक घटना आहे. आरोपी वॉचमनला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अन्सारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सकाळच्या सुमारास आरोपी मोहम्मद अन्सारीने संधी साधून मुलीवर अत्याचार केला. १९ डिसेंबरच्या सकाळी ९ ते १२ दरम्यान ही घटना घडली. अल्पवयीन मुलीला एका क्लासरुममध्ये नेऊन हे गैरकृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेनंतर वेदना असह्य झाल्याने मुलगी रडत होती. मुलीच्या पालकांनी तिच्या रडण्याचं कारण विचारलं. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितलं. त्यावेळी घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पालकांनी त्यानंतर मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद अन्सारी विरोधात पोस्को अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.