पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुणे शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसात पुणे महापालिकेने कडक पावलं उचलली आहे. शहरात विविध पद्धतीने अस्वच्छता पसरवणाऱ्या पुणेकरांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर लघवी करणाऱ्यांविरोधातही महापालिकेने कारवाई केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या तब्बल १५,४८३ नागरिकांवर पुणे महापालिकेची कारवाई केली आहे. गेल्या अडीच महिन्यात घनकचरा विभागाने १८ हजार २५८ जणांकडून ७२ लाख ४३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे, प्लास्टिक पिशवी वापरणे, थुंकणे, ओला कचरा जिरवणे आदींबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. एकूण १७,४२९ नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.