बांगलादेशात बेनापोल एक्स्प्रेस पेटवली ; चार जणांचा होरपळून मृत्यू (पहा व्हिडीओ )

0

ढाका ;- शुक्रवारी रात्री दंगलखोरांनी ढाका येथील बेनापोल एक्स्प्रेसमध्ये आग लावल्याची घटना बांग्लादेशात निवडणुकीच्या तोंडावर घडली. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.रेल्वेमध्ये प्रवास करणारे अनेक नागरिक भारतीय होते.

द डेली स्टारच्या वृत्तानुसार, गोपीबाग परिसरात रात्री 9 च्या सुमारास ही आग लावण्यात आली. रात्री 10.20 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. बीडीन्यूज24 च्या वृत्तानुसार, ट्रेनमध्ये प्रवास करणारे अनेक नागरिक भारतीय होते. ही आग ढाकाला जाणाऱ्या ट्रेनच्या जवळपास चार डब्यांमध्ये पसरली होती. पोलीस या आगीत जीवितहानी झालीय का, किती नुकसान झाले याचा शोध घेत आहेत. पोलिसांना संशय आहे की डब्याच्या आत आणखी लोकं अडकली असू शकतात. ही ट्रेन ढाकाला बांग्लादेशाच्या सगळ्यात महत्वपूर्ण अशा बंदरगाह बेनापोलला जोडते.

बांगलादेशमध्ये रविवारी होणाऱ्या महत्त्वपूर्ण संसदीय निवडणुकांपूर्वी हिंसाचारामुळे निवडणुकांवर परिणाम झाला आहे. प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि त्यांच्या मित्रपक्षांनी पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची आणि मुक्त, निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी काळजीवाहू सरकार स्थापन करण्याची मागणी करत निवडणूक प्रक्रियेवर पूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.