उद्यापासून बालनाट्य स्पर्धेची तिसरी घंटा वाजणार

0

जळगाव (राहुल पवार), लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा मंगळवारपासून (१० जानेवारी) सुरुवात होणार असून ही स्पर्धा महाबळ रोड येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात होणार आहे.

येत्या काळात रंगभूमीला उत्तम रंगकर्मींची कमतरता भासू नये आणि लहान वयातील कलाकारांतील कलागुणांना उत्तेजन व प्रोत्साहन देऊन भावीकाळात उत्तमोत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासन बालनाट्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेची जळगाव केंद्राची आज सुरुवात होत आहे. उद्यापासून सुरू होणारी स्पर्धा ही १०, ११, १२ आणि १३ जानेवारी अशी सुरू राहणार असून, या स्पर्धेत रोज पाच ते सहा नाटके याप्रमाणे चार दिवसांत एकूण २२ बालनाट्य सादर केली जाणार आहेत.

उद्या सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार असून, दुपारी ५ वाजेपर्यंत ही नाटके सादर होणार आहेत. जास्तीत जास्त रसिकांनी या स्पर्धेला उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. ही नाटके रसिकांना विनामूल्य पहाता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.