भुसावळ ते मुंबई सेंट्रल एक्सप्रेस सोमवारपासून धावणार

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ ते मुंबई सेंट्रलसाठी (Bhusawal to Mumbai Central) सोमवार पासून नवीन एक्सप्रेस धावणार असुन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दूरचित्रप्रणाली द्वारे सदर एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवणार आहे, यासाठी खासदार रक्षाताई खडसे (Rakshatai Khadse) यांनी प्रयत्न केले होते.

भुसावळ ते मुंबई साठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात यावी अशी जिल्ह्यातील प्रवाशांची अनेक दिवसांपासून मागणी होती, तसेच खासदार रक्षाताई खडसे यांनी याबाबत रेल्वे मंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांची अनेकदा भेट घेऊन मागणी केली होती, अखेर त्याला यश येऊन सोमवार पासून ट्रेन सुरू होत आहे. सदर ट्रेन आठवड्यातुन तीन दिवस म्हणजे रविवार, मंगळवार व शुक्रवार संध्याकाळी ५:३० वाजता भुसावळ येथून निघून मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता पोहचणार आहे. अशी माहिती यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.