श्रीरामजन्मभूमीवर मांस-दारूवर बंदी घालण्याचे संकेत!

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM yogi Adityanath) यांनी महत्वपूर्ण संकेत दिले आहे. अयोध्येत मांस-दारूवर बंदी घालण्याचे संकेत योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या (Shri Ram Janmabhoomi Temple) बांधकामाची पाहावी करत असतांना ते म्हणाले कि, अयोध्या हि धार्मिक नागरी आहे. अशा परिस्थिती जनभावनांचा आदर करत या ठिकाणी मास आणि मद्यपानावर बंदी घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू असून, त्यांच्या या वक्तव्यावरून आगामी काळात मांस आणि दारूवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण देशातील काही प्रमुख धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आधीच मांस आणि मद्य सेवनावर बंदी आहे?

कोण कोणत्या ठिकाणी बंदी आहे
हरिद्वार, उत्तराखंडमध्ये मांस, मासे आणि अंडी यांवर पूर्णपणे बंदी लावण्य्त आली आहे. यासोबतच दारूवरसुद्धा बंदी आहे. 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हरिद्वार, ऋषिकेश या ठिकाणांना मांसाहारापासून मुक्त करण्याचा उत्तराखंड राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. हरिद्वार हे हिंदूंचे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. येथे दर 12 वर्षांनी गंगा नदीच्या काठावर कुंभमेळा भरतो. तसेच अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळच्या परिसरात देखील मांस, आणि दारू विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरातच एक पवित्र तलाव देखील आहे. सुवर्ण मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षित संगमरवरी बनवलेल्या या धार्मिक स्थळाच्या बाहेरील भागात 24 कॅरेट सोन्याचा थर आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.