मोठी बातमी; औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय!

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यातील दोन शहरे औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) यांच्या नामांतराचा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राज्य सरकारने या दोन शहरांची नावे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला विरोध देखील झाला. दरम्यान, औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणात आता मोठी उपडेट समोर आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावे महसून क्षेत्र औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नवे राहणार आहे. मुंबई हायकोर्टाने याबद्दल निर्णय जाहीर केला आहे.

न्यायालयात औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर फक्त शहरांपुरता झालं होत. जिल्हा आणि तालुका पातळीवर कोणताही बदल झाला नाही. अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्यामुळे आव्हान देणाऱ्या याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. याचिकांचा वैधतेवर सरकारने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. यांनतर महसून आणि जिल्हा पटरीवरच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिका यच्च न्यायालयाने निकाली काढल्या आहे.

जेव्हा शासनाचा आदेश निघेल तेव्हा याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यास न्यायालयाने सूट दिली आहे. तसेच तूर्तास तालुका आणि जिल्हा पातळीवर नवीन नावे वापरणार नाही अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला हमी दिली आहे. आता औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ४ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.