केसीईचे आयएमआरमध्ये क्रीडा दिन साजरा

0

जळगाव :- केसीईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये “मेजर ध्यानचंद”, यांचे स्मरण करून आणि विविध क्रीडा उपक्रम राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त साजरे झाले. याप्रसंगी प्रसिद्ध धावपटू डॉ. तुषार चोथानी हे होते .

त्यावेळी तुषार चोथानी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना रनर्स ग्रुपच्या सर्व क्रीडा उपक्रमांची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना सातत्याने खेळत राहून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल कसा राखता येईल, याच्या महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. ताणतणावाचा सामना करण्यासाठी आणि जीवनात चांगले निर्णय घेण्यासाठी शारीरिक आरोग्य अधिक मजबूत बनते, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे म्हणाल्यात, “खेळाडूंनी शिस्त पाळणे फार महत्वाचे असते, या वयात तुम्ही आभ्यासाचे तास आणि खेळांचे तास हे टाईमटेबल नियमीत फाॅलो केले पाहिजे. जेणेकरून तुम्ही कायम उल्हासित राहाल” असे सांगितले.

याप्रसंगी सर्व प्राध्यापक तसेच आय एम आरचे सर्व खेळांचे खेळाडू व मागील वर्षीचे सर्व विद्यापीठ खेळाडू तसेच सर्व आभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अध्यक्षस्थानी संचालक प्रा. डॉ . शिल्पा बेंडाळे, अकॅडमीक डिन डॉ. तनुजा फेगडे , शारीरिक शिक्षण संचालक डॉ. नीलिमा पाटील उपस्थित होत्या

Leave A Reply

Your email address will not be published.