धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात परीक्षेला जाणाऱ्या मुलीवर अत्याचार

0

मुंबई ;- हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका विकृत नराधमाने परीक्षेला सकाळी जाणाऱ्या मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन अत्त्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अवघ्या आठ तासात त्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या . नवाज करीम (वय 40 वर्षे) आरोपीचं नाव आहे.

पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव इथली रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती. पीडित तरुणी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्ब्यात चढला. मुलगी एकटीच प्रवास करत होती. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला.

यानंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी मस्जिद बंदर स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासून त्या व्यक्तीची ओळख पटवली.

Leave A Reply

Your email address will not be published.