आज संध्याकाळी धडकणार बिपरजॉय वादळ…!

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्वांच्याच हृदयाची ठोके वाढवणार बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) आज संध्याकाळी किनारपट्टीवर धडकणार असल्याचे सांगितले होते. पण अरबी समुद्रात (Arabian Sea) तयार झालेले हे चक्रीवादळ गुजरातमधील कच्छ आणि सुराष्ट्राकडे सरकत असून आज रात्रीपर्यंत जाखाऊ बंदराजवळी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. लक्षणीय बाब अशी कि किनापट्टीवर आदळण्यापूर्वी ते किंचित स्वरूपात मवाळ झालेले असेल, पण तरीही त्यात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात बुधवारी जोरदार वाऱ्यासह मुसळदार पाऊस पडला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस ताशी १२५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, हा वेग १४५ किमी प्रतिताशीपर्यंत पोहोचू शकतो. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये दोन ते तीन मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. कच्छ, सौराष्ट्र हा परिसर ओलांडल्यानंतर या वादळाचा प्रभाव १६ जून रोजी दक्षिण राजस्थानवर दिसणार आहे. १७ जूननंतर परिस्थिती सुधारू शकते. ६-७ जून रोजी आग्नेय अरबी समुद्रावर बिपरजॉय तयार झाले. यानंतर ११ जून रोजी त्याचे तीव्र वादळात रूपांतर झाले.

कराचीकडे वळण्याची शक्यता
अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ रात्री ९.३० च्या सुमारास गुजरातच्या जाखाऊ बंदरावर धडकू शकते. आत्तापर्यंत ते दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत किनारपट्टीवर धडकेल असा विश्वास होता. अशातच त्याच्या मार्गात थोडासा बदल झाल्याचे समोर येत आहे. कारण त्याचा मार्ग आता पाकिस्तानातील कराचीकडे वळत आहे. चक्रीवादळ कराची आणि मांडवी किनारपट्टी ओलांडेल तेव्हा वाऱ्याचा वेग ११५-१२५ किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडी दिल्लीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.