रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात बारावीच्या विध्यार्थ्यांना मोफत “करिअर निवड” मार्गदर्शन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात करिअरचे टेन्शन असते. एक काळ असा होता की बारावीनंतर विद्यार्थ्यांसमोर फारसे पर्याय उपलब्ध नसायचे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी करियर निवडणे सर्वात कठीण होते. आपण कोणता विषय किंवा अभ्यासक्रम निवडावा जो आपले भविष्य घडवण्यास मदत करेल. या विचारांने विद्यार्थी तणावात असायचे. पण, आज करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विध्यार्थी त्यांच्या आवडीनिवडीनुसार करिअर निवडू शकतात. याअनुषंगाने विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीबद्दल तज्ञ मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध विनामूल्य मार्गदर्शन व समुपदेशन येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात करण्यात येणार आहे. ता.१९ सोमवार रोजी सकाळी ठीक ११ ते १ वाजेच्या दरम्यान या कार्यशाळेचे जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी खास आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे उद्धाघाटन रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते होणार असून यावेळी, प्रसिद्ध करियर मार्गदर्शक व समुपदेशक गिरीश कुलकर्णी हे बारावी नंतरच्या करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रायसोनी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे बारावी नंतर इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे तसेच विद्यार्थ्यांनी कोणती शाखा निवड करावी, प्रवेश प्रक्रिया अर्ज कसा करावा, कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, या व्याख्यानात बारावीच्या विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांना विनामूल्य लाभ घेता येणार असून या व्याख्यानात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे, शहरातील तसेच परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी पूर्वनोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६२३४५०६३६, ७७६७००२४४३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.