आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन इंद्रपिंप्री येथील तरुणाची आत्महत्या

0

अमळनेर : तरुणाने आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील इंद्रपिंप्री येथे घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन जगदीश पाटील (वय २६) या असे मयत तरुणाचे नाव आहे. चेतन याने काय म्हणतो मी तीन हजारच पगार ६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शेतातील आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पोलीस पाटील भानूदास पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहेत. दरम्यान, चेतन पाटील यांच्या पश्चात विधवा आई असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.