ज्युनिअर मेहमूद काळाच्या पडद्याआड; 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

1960-70 च्या दशकात बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेल्या ज्युनियर मेहमूद यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ते अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांचे खरे नाव नईम सय्यद होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंजत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांनी जितेंद्रला भेटण्याची इच्छा त्यांचा बालपणीचा मित्र सचिन पिळगावकर यांच्याकडे व्यक्त केली होती. जितेंद्र त्यांच्यावर उपचार घेत असलेल्या मुंबईतील रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठीही गेले होते. त्यांच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांना एक चांगला माणूस म्हणून स्मरण करावे ही त्यांची शेवटची इच्छा होती. ते म्हणाले होते की, जर तुमच्या मृत्यूनंतर चार लोक तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवतील तर समजा तुमचे जीवन यशस्वी झाले आहे.
ज्युनियर महमूदचे नाव डोळ्यासमोर येताच प्रत्येकाला त्याच्यावर चित्रित केलेले एक गाणे आठवते – “हम काले हैं तो क्या हुआ, दिलवाले हैं….” अखेर दीर्घ आजारानंतर ज्युनियर महमूद यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. मागील काही काळापासून सर्वजण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते, परंतु ते आता कॅन्सरशी लढा देऊ शकत नव्हते. अखेर गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनियर महमूद यांचे मित्र सलाम काझी यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.