घरात घुसून महिलेवर अत्याचार ; आरोपीला अटक

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील फैजपूर परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना फैजपूर परिसरात उघडकीस आली असून या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, फैजपूर परिसरात राहणारी एक ३० वर्षीय महिला घरात झोपलेली असताना आरोपी शेख आरिफ शेख जाबीर याने घरात घुसून महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार ५ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उप निरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.