कारची डम्परला धडक ; एकाच कुटुंबातील ५ जण ठार

0

 

सांगली , लोकशाही न्यूज नेटवर्क

स्वीप्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिल्याची घटना गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळघडली . या घटनेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला . .

चालक दत्ता हरीबा चव्हाण (वय 40रा.जत), नामदेव पुनाप्पा सावंत (वय 65), पदमिनी नामदेव सावंत (वय 60), श्लोक आकाशदिप सावंत (वय 8) मयुरी आकाशदिप सावंत (वय 38) अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात वरद सावंत (वय 10) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले.

हा अपघात घडला तेव्हा बाकी सगळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक दत्ता हा जखमी होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचा वाटेतचं मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.