आशिया कपच्या शेड्यूल बद्दल मोठी अपडेट, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आशियायी क्रिकेट परिषदेने आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) चे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. पाकिस्तानचे (Pakistan) यजमानपद असलेल्या या स्पर्धेला ३१ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून १७ सप्टेंबरला शेवटचा सामना होणार आहे. हि स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाईल. आशिया कप स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत (Sri Lanka) होणार आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ९ ते १६ दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या डबर्न येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत आशिया चषकाचे वेळापत्रक अंतिम केले जाईल. एका वृत्तपत्रानुसार, आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या नेतृत्वाखाली ऐसीसीही बैठक घेणार आहे.

या दिवशी होईल भारत-पाकिस्तान सामना
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान ३ सामने होण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे. दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात येत आहे. आशिया कप २०२३च्या वेळापत्रकाचा मसुदा सर्व संघांना पाठविण्यात आला आहे. या मसुद्याच्या वेळापत्रकानुसार, साखळी टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ सप्टेंबर रोजी सामना होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.