रावेर विधानसभा निवडणूक लढविण्यास मनीष जैन इच्छुक !

0

रावेर;- माजी आमदार मनीष जैन यांनी रावेर विधानसभा निवडणूक लढविण्याचा मनोदय पत्रकारांशी संवाद साधताना केला असून अजित पवार यांनी उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचे संकेत मनीष जाईन यांनी दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी निमित्त ते ना. अनिल पाटील यांच्या सोबत रावेर तालुक्यात आले होते.

रावेर यावल विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा चुरस निर्माण झाली असून माजी आमदार अरुण पाटील,आमदार शिरीष चौधरी ,अनिल पाटील,डॉ. कुंदन फेगडे आदीची नावे इच्छुक उमेदवारांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.