नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार १२ हज़ार रुपये

0

मुंबई : लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी भरीव तरतुद केली जाईल अशी अपेक्षा होती. या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यात नमो सरकारी शेतकरी योजना जाहीर करण्यात आली आहे. नमो सरकारी शेतकरी योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात बारा हजार रुपये जमा होणार आहेत.

पूर्वी शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये मिळायचे आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून, शेतकऱ्याला बारा हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यां दिलासा शेतकरी अनेक संकटाना तोंड देत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नमो शेतकरी योजना जाहीर करतो.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. त्यामध्ये राज्य सरकार आणखी 6 हजार रुपये देणार आहे. आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण बारा हजार रुपये मिळणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे

Leave A Reply

Your email address will not be published.