अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांच्या वेतनात वाढ

0

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : लोकशाही न्युज नेटवर्क

अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कससाठी तर फडणवीस सरकारने मोठी गुडन्यूज दिली आहे. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांचे पगार वाढवण्याबाबत घोषणा केली आहे. आशा वर्करचा पगार दीड हजार रुपयांनी वाढवला आहे. तर अंगणवाडी सेविकांनाही चांगल मानधन मिळणार आहे.
शा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये – गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये – अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये – मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये – अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये – अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार – अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली काही दिवसांपूर्वी आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी पगारवाढ आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं. शिंदे फडणवीस सरकारने पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढणारी महागाई आणि एकूण बाकीच्या गोष्टी लक्षात घेता आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा केली आहे. नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे, दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना – शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती – अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना – या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा – या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार

 

Leave A Reply

Your email address will not be published.