मनवेल येथे गोसेवा आयोग लागू झाल्याने जल्लोषात स्वागत

0

मनवेल ता.यावल : लोकशाही न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंमंत्री देवेद्र फडवणीस यांनी आज जाहिर केलेल्या अर्थ संकल्पात राष्ट्रीय गोसेवा आयोग लागू केल्याची घोषणा केल्याने मनवेल येथील  रेवानंदजी गो शाळेत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मनवेल येथील शेतकरी हिरामण माणिक पाटील व संतोष कौतिक पाटील यांचा हस्ते गोमातेचे पुजन करुन फटाक्याची आतीषबाजी करुन गोसेवा आयोग लागू केलेल्या घोषणेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी रेवानंदजी गोशाळेचे अध्यक्ष गोकुळ कोळी , विनायक सोनवणे, नवल पाटील, ग्राम पंचायत सदस्य मंगलसिंग पाटील, गणेश कोळी, कमलाकर पाटील , सुभाष पाटील ,विलास पाटील,दिवाकर कोळी, प्रभाकर काळे सह ग्रामस्थं उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.