डंपरच्या धडकेत विवाहिता ठार

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील विवाहिता जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे गोविंद हॉटेलसमोर महामार्गावर १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. कविता प्रशांत चौधरी (वय-३७) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

कविता प्रशांत चौधरी ह्या लग्नानिमित्त जळगावला कृषिकेन्द्र चालक विलास देविदास चौधरी यांच्यासोबत मोटारसायकलने जातं असतानाच पाळधीच्या पुढे गोविंदा हॉटेलसमोर भरधाव वेगाने मागून येणाऱ्या डंपर क्रमांक (जीजे ०३ बीवाय ६८३१) ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार विलास चौधरी व कविता प्रशांत चौधरी हे जागीच फेकले जाऊन डंपरचे चाक कविता चौधरी यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर विलास चौधरी यांच्या डोक्याला, पाय व डोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत जळगावी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले , त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कविता चौधरी यांच्या पश्चात पती व १४ वर्षे वयाचा सत्यम व १२ वर्षे वयाची भूमिका ही दोन मुले असून पाडळसरे येथे आईवडील, भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.