प्रेम माणसाला जगायला शिकवतं..!

0

 – पल्लवी सोनवणे

क्षणिक आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे. कुणी कुणाला I love you म्हणणे म्हणजे प्रेम नव्हे. खरं प्रेम बोलून दाखवायची गरज नाही. न बोलता करून दाखवायची आणि योग्य वेळी निभवण्याची कृती म्हणजे ‘प्रेम’. प्रेम म्हणजे एकमेकांची ताकद. खऱ्या प्रेमात लाल गुलाब दिलेच पाहिजे असे काही नाही. महागडे गिफ्ट देणं म्हणजे प्रेम नाही तर काटेरी झुडपावर चालताना एकमेकांना सावरत सोबतीचा हात देणे म्हणजे प्रेम.

प्रेमाचा उगम हा अंतरात्म्यातून होतो. जो स्वतःला आणि फक्त त्या परमेश्वरालाच माहीत असतो. एकमेकांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे प्रेम. आत्म्याचे संपूर्ण समर्पण म्हणजे प्रेम. काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास म्हणजे प्रेम. प्रेम हे चंद्राच्या शीतल छायेसारखं तर सूर्याच्या प्रखर तेजसारखं असतं. ते प्राजक्ताच्या फुलासारखं नाजूक आणि कोमल असतं. प्रेमात आधी मैत्री असते. शारीरिक आकर्षणाच्या पुढे जाऊन केलेले प्रेम म्हणजे Unconditional Love..

कसलीही अपेक्षा न ठेवता केलेले म्हणजे प्रेम. प्रेम माणसाला जगायला शिकवतं. प्रेम माणसाला संकटांशी लढायचं आणि जिंकायचं बळ देत असतं. प्रेम कुठल्या परिस्थितीत आपण एकटे आहोत याची जाणीव होऊ देतच नाही. प्रेम अर्ध्यावर साथ सोडत नाही. एकाचं चुकलं तर दुसऱ्याने सावरणं म्हणजे प्रेम. प्रेमात अहंकाराला स्थान नसतं. प्रेमात एकमेकांची सुखदुःख वाटून घेण्याची ताकद असायला पाहिजे. निराधार अवस्थेत एकमेकांचा आधार बनता आलं पाहिजे.

“मनाने मनापासून एखाद्याचं होणं म्हणजे प्रेम.”

असं प्रेम जर तुमच्यावर कोणी करत असेल तर, त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात सांभाळून ठेवा.. Happy Valentine’s day ♥️

Leave A Reply

Your email address will not be published.