मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय चित्रपट सृष्टीतील एव्हरग्रीन सुपरस्टार म्हणून ‘अनिल कपूर’ (Anil Kapoor) यांची ओळख आहे. नुकतच त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील ४० वर्षे पूर्ण केले आहेत. त्याच संदर्भात त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या चुलबुल्या स्वभामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. प्रत्येक भूमिका त्यांनी अगदी वेगळ्या पद्धतीने पार पाडल्या व त्यांनी तब्बल ४० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
नॉस्टॅल्जिक होऊन अभिनेता अनिल कपूर यांनी त्याचा पहिल्या हिंदी चित्रपट ” वो सात दिन ” मधील खास क्लिपची एक झलक इंस्टाग्राम रील मध्ये शेअर केली. ज्यात त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत प्रेक्षकांचे आभार मानले.
काय म्हणाले अनिल कपूर
आपल्या भावना व्यक्त करताना अनिल यांनी लिहिले ” आज मी एक अभिनेता आणि एक मनोरंजनकर्ता म्हणून 40 वर्षे पूर्ण करत आहे. 40 वर्षे तुम्हा प्रेक्षकांनी मला स्विकारला , प्रेम दिलं! मी जिथे आहे तेच मला करायचे आहे आणि हेच कायम करत राहायचं आहे “