अखेर प्रतीक्षा संपली, मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अखेर पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून पावसाची वाट सर्वच जण आतुरतेने पाहत होते. बिपोरजॉय वादळामुळे पाऊस लांबणीवर गेला होता. त्यामुळे जून महिना संपला तरी उकाडा मात्र संपायचं नाव घेत नव्हता. उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. तसेच बळीराजला सुद्धा आता सुखावला आहे. आता सगळीच चिंता मिटली असून पावसाने महाराष्ट्र एन्ट्री घेतली आहे. आज सकाळपासूनच दक्षिण मुंबईतील उपनगरमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली, बोरिवली, मानखुर्द परिसरात पाऊस पडला. तर दादर परिसरामध्येही सकाळपासून पाऊस पडत आहे. पहाटेपासून पावसाची रिमझीम सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.