Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»नवरात्रोत्सवात दिसणार मंगळेश्वरी भूमिमातेची विविधांगी रूपे
    जळगाव

    नवरात्रोत्सवात दिसणार मंगळेश्वरी भूमिमातेची विविधांगी रूपे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    श्री मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग पूजनाचेही आयोजन

    अमळनेर : – येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नवरात्रोत्सव भक्ती अन् चैतन्यमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. रविवार, १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या उत्सवादरम्यान श्री मंगळग्रह मंदिरात नऊ दिवस मंगळेश्वरी भूमिमातेची विविधांगीरूपे भाविकांना पाहावयास मिळणार आहेत. त्यात भूमिमातेला नऊ दिवस विविध रंगांतील वस्त्र परिधान करून मंदिरात आकर्षक सजावट केली जाणार आहे.
    नवरात्रोत्सवाच्या प्रारंभदिनी अर्थात घटस्थापनेच्या दिवशी यजमानांच्या हस्ते सकाळी विधिवत मंत्रोपचारांद्वारे विशेष पूजा-अर्चा होऊन घट बसविले जातील. याप्रसंगी मंगळेश्वरी भूमिमातेला नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करुन विराजमान केले जाईल. तसेच अखंड ज्योतही लावली जाईल. नवमीच्या दिवशी नवचंडी महायाग, तर विजयादशमी म्हणजेच दसºयाच्या दिवशी शस्त्रपूजाही होईल.

    भूमिमातेची असणार दहा वेगवेगळी रुपे

    पहिल्या दिवशी भूमिमातेला लक्ष्मी-बालाजीचे रुप देऊन पहिली माळ रोवली जाईल. दुसऱ्या दिवशी चंद्रासनावर विराजमान केले जाईल. तिसऱ्या दिवशी सूर्यमंडल व नवग्रह, चौथ्या दिवशी मोरावर विराजमान, पाचव्या दिवशी दशावतार, सहाव्या दिवशी गरुडावर विराजमान, सातव्या दिवशी मोहिनी रुप, आठव्या दिवशी सूर्यरथ, नवव्या दिवशी नर्मदा रुप तर दहाव्या दिवशी सिंहासनावर विराजमान केले जाणार आहे, असे मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाने कळविले आहे.

    नवरात्रोत्सवात महिलांना विशेष महत्त्व

    नवरात्र अर्थात दुर्गाेत्सव हा विशेषत: महिलांचा उत्सव. त्यामुळे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे शहरातील विविध महिला मंडळांच्या महिलांना विशेष महत्त्व देत मंडळाच्या अध्यक्षांना नवरात्रोत्सवादरम्यान महाआरतीचा विशेष मान देण्यात आला आहे

    #amalner #navratrotsav mangalgrah mandir
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif