मनसेच्या ८ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

समृद्धी महामार्गावरील नाशिकच्या गोंडे तोल नका तोडफोड प्रकरणी टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार मनसेच्या १२ ते १५ अज्ञात कार्यकर्त्यांवर व्हावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी रविवारी रात्रीतूनच मनसेच्या ८ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात विध्यार्थी सेना पदाधिकारी आणि राज्य कार्यकारणी सदस्यांचा समावेश असून इतर संशयितांचा नाशिक ग्रामीण पोलिसांनकडून शोध सुरु आहे.

समृद्धी महामार्गावर नाशिकच्या गोंदे टोल नाक्याबर राज ठाकरेंचे (Raj Thackeray) सुपुत्र तथा मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंचे (Amit Thackeray) वाहन अडविल्याच्या निषेधार्थ रविवारी मध्यरात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉडने टोलनाका क्रमांक दोनवरील साथ बूथची तोडफोड करत मोठ्या प्रमाणावर नासधूस केली होती. यात ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून मनसेच्या १२ ते १५ अज्ञात कार्यकर्त्यांवर व्हावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच, रविवारी रात्रीतूनच मनसेच्या ८ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात विध्यार्थी सेने पदाधिकारी आणि राज्य कार्यकारणी साड्यांचा समावेश असून इतर संशयितांचा नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे.

प्रकरण काय आहे?
अमित ठाकरे ज्या गाडीमध्ये बसले होते त्या गाडीची नोंद मनसे पक्षाच्या नावाने होती. समृद्धी महामार्गावर रात्री ९.२१ वाजता गोंदे फाट्यावरील टोलनाक्यावर अमित ठाकरे त्यांच्या गाडीचा फास्टटॅग हा ब्लॅकलिस्ट असल्याचं दाखविण्यात आलं होत. पण गाडीमध्ये अमित ठाकरे आहेत हे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं नाही . पण जसं त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा मात्र ताफ्याला सूट देण्यात अली होती. रात्री अडीच वाजेच्या सुमारास संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड करून, नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.