अखिल भारतीय माळी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी भूषण महाजन यांची निवड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील माळी समाजाचे युवा कार्यकर्ते तथा समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा आदेशाने युवक राष्ट्रीय अध्यक्ष नितीन शेलार यांनी केली आहे.

भूषण महाजन हे सन 2014 पासून माळी समाजाच्या कार्यात सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी 2017 या वर्षी माळी समाजाचे मुखपत्र माळी साम्राज्य साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. या साप्ताहिक वृत्तपत्रच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले आहेत. सन 2019 पासून ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणुन काम करीत आहेत.

समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विविध आंदोलने ओबीसी जनजागृती बैठका घेतल्या आहेत. त्यांचा या सर्व कार्याचा आढावा व त्यांचा उत्तर महाराष्ट्र विभागात असलेला संपर्क याचा आढावा घेत त्यांची ही निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.