खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा दुसऱ्या दिवशीही स्थगित

0

 

नवी दिल्ली ;- अमरनाथ गुफेकडून बालटालकडे येणारा परतीचा मार्ग पावसामुळे पूर्णपणे खचला आहे.त्यामुळे पाऊस, बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्र सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली.विविध तळांवर सुमारे ५० हजार भाविक अडकले आहेत.

ठिकठिकाणी या मार्गावरील पूलही वाहून गेले आहेत. त्यापैकी चार हजारांवर भाविक पंचतर्णी येथे अडकले आहेत. याठिकाणी आयटीबीपीने उभारलेल्या तंबूतही पाणी शिरले आहे, तर वीजपुरवठा बंद असल्याने कुटुंबीयांचा या भाविकांशी संपर्क होत नाही.

शुक्रवारी पंचतर्णी आणि शेषनाग या ठिकाणावरून जवळपास आठ हजार भाविक गुफेच्या दिशेने रवाना झाले होते. त्यातील जवळपास एक हजार भाविक सुखरूप बालटाल येथे पोहोचले, तर चार ते पाच हजार भाविक हे पंचतर्णी येथेच अडकले आहेत. पावसामुळे यात्रा तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने पंचतर्णी येथे भाविक तंबूत शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात कुडकुडत दिवस काढत आहेत. तंबूमध्ये थांबण्यासाठी एका भाविकाकडून ६५० रुपये घेण्यात येत होते. परंतु, आता बालटालकडे परत येण्यासाठी मार्गच नसल्यामुळे तंबू व्यावसायिकांनी प्रत्येकी एक हजार रुपये उकळले. हजारो भाविक श्रीनगरध्येच थांबले असून, तेथील हॉटेल व्यावसायिकांनीही आपले दर वाढविले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.