सोन्याच्या दराने घेतली मोठी उसळी ! ; जाणून घ्या आजचे भाव

0

नवी दिल्ली :– सोन्याच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यातच आता पुन्हा सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,९०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,८९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,२८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,२७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५३,९९२ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,९०० प्रति १० ग्रॅम आहे.

पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९९२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,९०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९९२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,९०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९९२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,९०० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.