दिल्लीत पावसाने मोडला ४१ वर्षांचा विक्रम, १९८२ नंतर २४ तासांत सर्वाधिक पाऊस

0

नवी दिल्ली : – देशाची राजधानी दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जुलै महिन्यात २४ तासांत सर्वाधिक पावसाचा ४१ वर्षांचा विक्रम मोडला गेला.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने दिल्लीतील ४१ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १५३ मिमी पावसाची नोंद झाली.

सन 1982 नंतर हा सर्वाधिक 24 तासांचा पाऊस आहे. यापूर्वी 1982 मध्ये 169.9 मिमी पाऊस पडला होता. त्याच वेळी, आज कमाल तापमान 30 अंश राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, मान्सूनचे वारे आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या एकत्रित परिणामामुळे दिल्लीत मुसळधार पाऊस पडत आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते, शनिवारपासून पाऊस पडल्यानंतर रविवारी दिल्लीतील हवेचा निर्देशांक 50 किंवा त्यापेक्षा कमी होऊ शकतो. त्यामुळे हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत राहू शकते, परंतु एका दिवसानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा समाधानकारक श्रेणीत पोहोचेल.

रविवारपासून उद्योगनगरीत मुसळधार पाऊस पडत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सकाळच्या मुसळधार पावसाने पाणी तुंबण्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. रविवार असला तरी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र शहराच्या सखल भागात पाणी साचल्याने समस्या निर्माण होत आहेत

 

Leave A Reply

Your email address will not be published.