बनावट देशी दारूचा साठा जप्त; अमळनेर पोलिसांची कारवाई

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमळनेर येथे बनावट देशी दारू तयार करून विकणाऱ्यांवर अमळनेर पोलिसांची कारवाई केली आहे. या कारवाईतून मोठ्या प्रमाणावर बनावट देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या  गुप्त माहितीनुसार, अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या बनावट दारू तयार करण्याचा चालता-फिरता कारखाना चालवला जात आहे. या ठिकाणी तीन चार तासात स्पिरिटपासून बनावट दारू तयार करत असल्याची पक्की खात्रीशीर झाल्यावर शुक्रवार दि. १९ ऑगस्ट रोजी पथकातील अधिकारी आणि अंमलदार जानवे तालुका अमळनेर शिवारात गेले.

तेथे दोन व्यक्ती १ लाख ४१ हजार १२० रुपये किमतीच्या ४२ बॉक्समध्ये ४८ बाटल्याप्रमाणे एकूण २०१६ बनावट दारूच्या बाटल्या आणि बनावट दारू बनवणेकरता लागणारे साहित्य मिळाले.

याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश प्रभाकर भावसार रा. पाटील गढी, भालेराव नगर, अमळनेर आणि भटू वसंत पाटील रा. जानवे, ता. अमळनेर (शेतमालक) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, नागपूर विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस नाईक कैलास शिंदे, पोलीस नाईक हितेश चिंचोरे, पोलीस नाईक योगेश महाजन, पोलीस कॉन्स्टेबल भुषण पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.