राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत जळगावच्या कलाकारांनी रोवला मानाचा तुरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नांदेड येथे दिनांक १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२२ कालावधीत सप्तरंग राष्ट्रीय नृत्य स्पर्धा (Saptarang National Dance Competition) आयोजित करण्यात आली होती. यात जळगावच्या (Jalgaon) गंधर्वि कथक नृत्यालयातील (Gandharvi Kathak Nrityalaya) हिमानी महाजन, महेक फुलवानी, रूद्राक्षी शिंदे, तन्वी शाह या चार विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता.

कौतुकाची बाब म्हणजे चारही विद्यार्थिनींनी आपापल्या वयोगटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्राप्त करत जळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकाविले आहे. या सर्वांना जास्मिन गाजरे, संचालिका गंधर्वि कथक नृत्यालय यांचे मार्गदर्शन लाभले आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात ओडिसा येथे झालेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय कटक महोत्सवात सुध्दा जास्मिन यांना यांच्या शिष्यांसमवेत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जळगावचा ठसा उमटवल्याबद्दल या सर्वांचे कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.