मुंबई अलर्टवर ! 26/11 सारख्या हल्ल्याची पोलिसांना धमकी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई पोलिसांना (Mumbai Police) 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज (Mumbai Police Threatened) आला आहे. भारताबाहेरील क्रमांकावरून मेसेज आल्याची माहिती मिळत आहे. या मेसेजमुळे मुंबई अलर्टवर आहे.

कंट्रोल रूमच्या (traffic control room) व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी (Pakistan) नंबरवरून धमकीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये म्हटलंय की, जर त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलंय की, भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासोबतच दुसऱ्या तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे.

दरम्यान गुरुवारी सकाळी राज्यातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीत तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

मात्र या प्रकरणात कोणताही दहशतवादी संबंध सापडला नसल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. या संशयास्पद बोटीचं नाव लेडी हान असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेकडे असल्याची माहिती फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली होती. या बोटीतून तीन ‘अ‍ॅसॉल्ट रायफल’, स्फोटकं आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.