अश्वमेध पब्लिक स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

0

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

अश्वमेध पब्लिक स्कूल टाकळी (प्र.दे.) ता. चाळीसगाव येथे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक सुभाष पाटील आणि अनन्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव आनंदात साजरी करण्यात आला.

अश्वमेध पब्लिक स्कूलमध्ये  विद्यार्थ्यांनी बासरी, मोराची पिसे आणि मटकी सजावटी सोबतच भगवान श्रीकृष्ण आणि राधाची वेशभूषा केली होती. परिसर सुंदरपणे सजवण्यात आला होता. भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्राचे चित्रण करणारे देखावे सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामायिकरण आणि आदराची भावना जागृत करणे हा उत्सवाचा उद्देश होता.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे काल्याच्या प्रसादाने भरलेली दहीहंडी फोडणे. शाळेत विभागनिहाय म्हणजे पूर्व प्राथमिक ते इयत्ता ५ ते १० तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या दहीहंडी फोडण्यासाठी लावण्यात आल्या होत्या. हा कार्यक्रम मुख्याध्यापक दीपक पाटील, वरिष्ठ शिक्षिका स्वाती पगार, संदीप चव्हाण, स्वाती पाटील, शर्मिला पवार, सविता पाटील, शीतल पाटील ह्यांच्या नियोजनाने व इतर शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.