अमळनेरच्या गटविकास अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा आज पहाटे भीषण अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते. अमळनेर धुळे या मार्गाने ते नाशिकला जाण्यासाठी एमएच १९. डीव्ही ४१९९ क्रमांकाच्या शासकीय वाहनाने निघाले होते. धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून धडक दिली. यात ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले असलेले एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले.

यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य केले. तसेच प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी देखील अपघातस्थळ गाठले. याप्रकरणी पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

एकनाथ चौधरी हे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्याकडे यावल येथील गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील होता.

एकनाथ चौधरी यांचा मृतदेह येथील धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.