चाकूचा धाक दाखवून फळविक्रेत्याला लुटले !

0

अमळनेर ;- फळ विक्री करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून गल्ल्यातील तीन हजाराची रोकड लांबवल्याची घटना शहरातील बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी रविवारी २५ जून रोजी रात्री नऊ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फयाज युनूस बागवान (वय-१९) रा. शिवशक्ती चौक, अमळनेर हायुवक फळ विक्रीचे काम करीत असून २५ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अमळनेर बसस्थानकाजवळील त्याच्या दुकानावर फळ विक्री करत असताना संशयित आरोपी कात्या उर्फ गौरव प्रमोद महाले रा. शिवाजी नगर, शिरूर नाका, अमळनेर हा तिथे आला. त्याच्या हातातील चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत तरूणाच्या गल्ल्यातून तीन हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून काढून पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर फयाज बागवान या तरुणाने अमळनेर पोलीस स्टेशनला आरोपी कात्या उर्फ गौरव प्रमोद महाले यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.