Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कत्तलीसाठी नेणाऱ्या ५५ गुरांची सुटका ; गोशाळेत गुरांची रवानगी
    जळगाव

    कत्तलीसाठी नेणाऱ्या ५५ गुरांची सुटका ; गोशाळेत गुरांची रवानगी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;– शहरातील अक्सानगर भागात कत्तलीसाठी आणलेल्या ४० सोडवून दुसऱ्या घटनेत चोरीची १५ गुरे वाहनात कोंबून कत्तलीसाठी आणताना तीन वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. दोन्ही घटनेत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी एकूण ५५ गुरांना वाचवून त्यांची होणारी कत्तल रोखून सर्व गुरांना कुसुम्ब गोशाळेत नेण्यात आले. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

    शहरातील मेहरूण परिसारातील मास्टर कॉलनी, पिरजादे वाडा, अक्सा नगर, मेहरूण या भागात रविवारी २५ जून रोजी सकाळी १० वाजता चोरीची जनावरे कोंबून त्यांची कत्तलीसाठी तीन पीकअप व्हॅन मधून वाहतूक करून मास्टर कॉलनीकडे जात असताना एमआयडीसी पोलीसांनी पकडले. यात १५ गुरांची निर्दयतेने कोंबून वाहतूक करत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी या प्रकरणी शेख राजीक शेख रफिक, शेख रेहान शेख यसूफ (रा.वरणगाव), अदनान कय्युम खान (दत्तनगर, मेहरूण), इफ्तीखार शरीफ खान (मास्टर कॉलनी), सर्फराज रहीम शेख, सैय्यद वाजीद सैय्यम इब्राहीम (रथ चौक), सैय्यद अनीस सैय्यद हमीद या सात जणांना ताब्यात घेतले आहे.

    तर दुसऱ्या घटनेत अक्सानगर भागात असरार शेख मुक्तार शेख व त्याचा लहान अल्पवयीन भाऊ हे पत्र्याच्या शेडमध्ये राज्यात गोवंश कत्तल करण्यास प्रतिबंध असतांना सुध्दा कत्तल करताना आढळून आले. तसेच या ठिकाणी चोरी करून आणलेले ४० गुरे कत्तलीसाठी आणून ठेवल्याचे आढळून आले. पोलीसांनी ४० गुरांची सुटका केली. दोन्ही कारवाईत एकूण ५५ गुरांची सुटका करण्यात आली असून, ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या ५५ गुरांना कुसुंबा येथील आर.सी.बाफना गो सेवा अनुसंधान गोशाळा येथे ठेवण्यात आले आहे.

    ही कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, सचीन पाटील, योगेश बारी, इम्रान सैय्यद, किशोर पाटील, किरण पाटील, मंदार पाटील, चेतन पाटील, आशा पांचाळ यांनी केली. या गुन्ह्याच्या तपास दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.

    #crime jalgaon MIDC Police MIDC Police Station
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif