अक्षयच्या सेल्फीचा “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये समावेश

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या तरी त्याच्या सेल्फी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार म्हंटल तर आपल्या अतरंगी स्वभामुळे जास्त चर्चेत असतो. असाच काही अतरंगी प्रमोशन त्याच्या चितपटाचे तो करतांना दिसत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याची एक झलक बघण्याची आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा असते. नुकतीच अनेक चाहत्यांची अक्षय सोबत फोटो काढण्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. सोबतच त्याने आपल्या नावे रेकॉर्डही केला आहे.

अक्षयने त्याच्या आगामी सेल्फी (Selfie) या चित्रपटासाठी हटके प्रमोशन केले आहे. या प्रमोशनच्या निमित्ताने त्याने चक्क एक नवा विक्रम रचला आहे.अक्षय कुमारने चक्क सेल्फीचा रेकॉर्ड स्वत:च्या नावे केला आहे. तीन मिनिटांत सर्वात जास्त सेल्फी घेण्याचा रेकॉर्ड त्याने मोडला आहे. त्यानं एक नवीन रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे. अक्षयने एका कार्यक्रमात हा रेकॉर्ड रचला. एका कार्यक्रमात त्याने तीन मिनिटांत तब्बल 184 सेल्फी काढले. त्याच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.