मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून २ एप्रिलला मतदान होणार आहे. मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत थोरगव्हाण, पथराडे, दगडी व पिळोदा खुर्द येथील शेतकरी सभासद आहे. सर्वसाधारण आठ जागा, महिला राखीव दोन, इ.मा.व.एक,अनु.जाती/जमाती एक ,वि.जा.भ.ज.व विमाप्र.एक, असा तेरा जागांसाठी २ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रस्थापितांकडून निवडणूक बिनविरोध करण्यांसाठी प्रयत्न सुरू आहेत. चार गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत पिळोदा खुर्द व पथराडे गावातून एक-एक संचालक, थोरगव्हाण गावातुन दोन ते तीन संचालक व उर्वरीत संचालक मनवेल येथील राहत असल्यामुळे निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे बोलले जात आहे.

यावल तालुक्यात कर्ज वाटप या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाटप पाच कोटी पर्यंत होती. संस्थेचे सभासद एक हजारच्या जवळ पास होते मात्र राष्ट्रीकृत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केड्रीट कार्डच्या माध्यमातून कर्जे मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी सभासद कमी झाल्याने निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे बोलले जात आहे. २४ फेब्रुवारी पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असून २ मार्च पर्यत उमेदवारी अर्ज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल येथे दाखल करण्यात येणार आहे.

३ मार्च रोजी छाननी, ६ ते २० मार्च पर्यत माघार, २१ मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहिर करुन चिन्ह वाटप करणे, २ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून के.व्हि.पाटील मुख्य लिपीक यावल कामकाज पहात असून संस्थेच्या सचिव सुनिल सुरवाडे सहकार्य करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.