एनआयएची तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी कारवाई

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आतंकवादी आणि आतंकवाद यांच्या घाणेरड्या कृत्यांना वेळीच रोखणं गरजेचे आहे. त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी जातात. राष्ट्रीय तपास संस्था ने खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर तसेच ड्रग तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने देशभारतील वेगवेगळ्या राज्यातील तब्बल 76 ठिकाणी छापे टाकत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार यांच्यासाठी काम करणाऱ्या 6 आरोपींना अटक केली आहे. एनआयए याप्रकरणी पुढील कारवाई करत आहे.

NIA ने अटक केलेल्या आरोपींमध्ये लकी खोखर, लखवीर सिंग, हरप्रीत, दलीप बिश्नोई, सुरिंदर आणि हरी ओम यांचा समावेश आहे. एनआयएने मंगळवारी 8 राज्यांतील 76 ठिकाणी छापे टाकले. या कारवाई अंतर्गत पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.