“मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे” मध्ये राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

नव्वदीच्या दशकतात सर्वानाच आपल्या अभिनयाच्या जादू ने वेड लावणारी अभिनेत्री राणी मुखर्जी (Actress Rani Mukerji) नवीन चित्रपट घेऊन येत आहे. तस पहिले तर राणीची क्रेझ अजूनही आहे तशीच आहे. बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ (Mrs.Chatterjee v. Norway) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लक्ष वेधून घेणारा आहे. राणी मुखर्जीचा दमदार अभिनय यात बघायला मिळतो आहे. हा चित्रपट 2011 मधील नॉर्वेतील प्रसिद्ध प्रकरणावर आधारित आहे. त्यात भारतीय दाम्पत्याला त्यांच्या मुलांपासून वेगळे केले जाते.

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातीला नॉर्वेत वास्तव्याला असलेल्या एका बंगाली कुटुंबापासून होते. या कुटुंबात मिस्टर आणि मिसेस चॅटर्जी आणि त्यांची दोन मुले आहेत. मात्र मुलांचे संगोपण योग्य पद्धतीने करत नसल्याचे कारण देत नॉर्वे सरकारकडून या दाम्पत्याची मुले घेतली जातात. मग आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी या पती-पत्नीने दिलेल्या लढ्याचे चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.

आशिमा छिब्बर (Ashima Chhibbar) यांनी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी हा चित्रपट 3 मार्च 2023 ला रिलीज होणार होता पण नंतर त्याची रिलीज डेट बदलून 17 मार्च 2023 करण्यात आली. याआधी राणी 2021 मध्ये आलेल्या बंटी और बबली या चित्रपटात झळकली होती. कोरोनानंतर दोन वर्षांनी राणी या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.