क्रूरतेचा कळस; चौदा वर्षीय मुलीचे मुंडण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार… आरोपीला अटक…

0

 

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शहरातील एक भयंकर घटना समोर आली आहे. ज्या घटनेत एका गुंडाने क्रूरतेचा कळस गाठत एका चौदा वर्षाच्या मुलीचे मुंडण करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा संताप अनावर…

सुप्रिया सुळे गृहमंत्र्यांवर निशाणा साधत म्हणाल्या की, एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सकाळ पासून संबंधित तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कायद्याच्या चौकटीत आरोपीला शिक्षा केली जाणार आहे. महिला आयोगाच्यावतीने पाठपुरावा करीत असतांना आरोपीला अशा पद्धतीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून या शिक्षेचा वचक इतरांवर देखील राहिला पाहिजे. तसेच अशा पद्धीतीच्या घटना घडू नये. असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.