शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याजवळ पिस्तूल सापडते तेव्हा……!

0

पिस्तूल आढळल्याने शिक्षकही चक्रावले ! ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

भुसावळ : -शाळेच्या पहिल्याच दिवशी एका नववीच्या विद्यार्थ्याकडे दफत्तर तपासणीत एक ५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आढळून आल्याची धक्कदायक घटना येथून जवळ असणाऱ्या अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये उघडकीस आली असून यामुळे शिक्षकही या प्रकारामुळे चक्रावले असून शेक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संशयित विधी संघर्ष बालक असून त्याच्या विरुद्ध शाळेच्या प्राचार्यांच्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळातील एका भागातील रहिवासी कर्मचार्‍याचा मुलगा हा अकलूदजवळील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केल्यानंतर नववीच्या एका विद्यार्थ्याकडे गावठी पिस्तूल आढळून आल्याने शिक्षकांमध्येही खळबळ उडाली होती. शाळा प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर फैजपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ व सहकार्‍यांनी धाव घेत कट्टा जप्त केला तर विद्यार्थ्यालाही चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संशयित विधिसंघर्षित विद्यार्थ्याविरोधात पोदार शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल .शहा यांनी फिर्याद दिल्यावरून फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.