चाळीसगावात ११ लाखांचा गुटखा पकडला ! चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई

0

चाळीसगाव ;- शहरातील खरजाई रोडवरील रेल्वे गेटजवळ एका महिन्दत्र पीक अप वाहनातून सुमारे ११ लाखांचा विमल गुटखा, पान मसाला , सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल आढळून आला याबाबत एकाविरुद्ध चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, १४ जून रोजी रात्री ८ :४० वाजेच्या सुमारास खरजाई रोडवरील रेल्वे गेटजवळ एका महिंद्रा पीक अप वाहन क्रमांक एम एच -१९ सीएक्स ००८३ यामध्ये गुटखा, पान मसाला , सुगंधित तंबाखू असा माल अवैधरित्या विक्रीसाठी नेत असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने महिंद्रा पीक अप वाहनासह गुटखा पान मसाला , सुगंधित तंबाखू असा एकूण १८ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुटखा , पान मसाला ,तंबाखू .यांची किंमत ११ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल असून वाहन ७ लाख रुपये किमतीचे असे एकूण १८ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. याबाबत अक्षय गुलाब कोतकर वय २४ रा. गुरुवर्य नगर जिरापूर रोड चाळीसगाव याच्याविरुद्ध १६ रोजी रात्री ८ :४० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि विशाल टकले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.