नॉट रिचेबल अजित पवारांची पुण्यातील ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी

0

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क

अजित पवार नॉटरिचेबल असल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अखेर अजित पवार समोर आले आहेत. खराडीमधील रांका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील उपस्थित आहेत.

अजित पवार यांच्या हस्ते रांका ज्वेलर्ससचं उद्घाटन होणार आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सकाळच्या शपथविधीचा फोटो पोस्ट केला होता.

त्यामुळे अजित पवार नॉटरिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अखेर अजित पवार पुण्यात पत्नीसोबत रांका ज्वेलर्सच्या दुकानात दिसले. काय होतं अजंली दमानियांचं ट्विट 2019 मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून सरकार स्थापन केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.