फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथे ३८ बेड असलेला नवीन मजला-‘सिम्‍फनी’चे उद्घाटन 

0

लोकशाही, विशेष लेख

मुंबईचे आरोग्‍य रक्षक म्‍हणून २० वर्षांचा वारसा असलेल्‍या फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने (Fortis Hospital Mulund) त्‍यांचा नवीन मजला-सिम्‍फनीचे उद्घाटन केले. या ३८ बेड असलेल्‍या मजल्‍याचे उद्घाटन पारसधामचे प्रमुख परमपूज्‍य राष्‍ट्रसंत परम गुरूदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. हा अत्‍याधुनिक मजला संपन्‍न क्लिनिकल केअर व बायोफिलिक डिझाइनच्‍या माध्‍यमातून सर्वांगीण उपचार देण्‍यावर लक्ष केंद्रित करत निर्माण करण्‍यात आला आहे. रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांना हॉस्पिटलायझेशन-संबंधित ताण कमी करण्याच्‍या उद्देशाने पोषण आणि उपचारात्मक प्रभावासाठी हा मजला डिझाइन केला आहे.

सिम्‍फनी या नवीन स्‍पेशालिटी मजल्‍यावर आधुनिक सुविधा आणि उत्तम दृश्‍यासह पुरेशा प्रकाश असलेल्‍या रूम्‍स आहेत, ज्‍यामुळे रूग्‍णांना अत्‍यावश्‍यक मानसिक व शारीरिक उत्तेजन मिळते. या ऑफरिंगमध्‍ये सानुकूल कार्यक्षमता व रूग्‍ण केअरला प्राधान्‍य देत या मजल्‍यावरील केअरगिव्हिंग टीम रूग्‍ण व अभ्‍यागतांसाठी सुरक्षित वातावरण मिळण्‍यास मदत करेल.

उद्घाटनाप्रसंगी फोर्टिस हॉस्पिटल, महाराष्ट्राच्‍या व्‍यवसाय प्रमुख डॉ.एस.नारायणी (Dr. S. Narayani) म्‍हणाल्‍या, ‘‘आधुनिक सुविधांच्‍या परिणामासह रूग्‍ण केअरवरील बायोफिलिक डिझाइन व निष्‍पत्तींचा बारकाईने अभ्‍यास करण्‍यात आला आहे. यामुळे रूग्‍णांचा उपचार करण्‍याला गती मिळण्‍यासाबत त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍यांना व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना केअर देण्‍याच्‍या तणावाचा प्रभावीपणे सामना करण्‍यास मदत देखील होते. मुंबईकरांच्‍या आरोग्‍याचे रक्षक म्‍हणून उत्‍साहवर्धक डिझाइनने युक्‍त आमचा नवीन मजला आणि रूग्‍ण केअरप्रती दृष्टिकोन आम्‍ही रूग्‍णांना देत असलेल्‍या प्राधान्‍याचे आणखी एक उदाहरण आहे.’’

Leave A Reply

Your email address will not be published.